चीनमधील हुबेई येथील दळणवळण बंदी ८ एप्रिलला हटवणार
बीजिंग (चीन) – चीनच्या हुबेई प्रांतामध्ये कोरोनामुळे गेल्या ३ मासांपासून असलेली दळणवळण बंदी (लॉकडाऊन) ८ एप्रिलला उठवण्यात येणार आहे, असे चीनने घोषित केले आहे. हुबेईची राजधानी असलेल्या वुहानमध्ये दळणवळण बंदी उठवल्यावर ११ लाख लोकांना दिलासा मिळणार आहे. येथे गेल्या ५ दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. वुहानमध्ये आतापर्यंत ५० सहस्र रुग्ण आढळले आहेत, तर हुबेईमध्ये एकूण ६७ सहस्र ८०१ इतके जण कोरोनाग्रस्त आहेत. काही तज्ञांच्या मते, अन्य देशांमधील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे चीनमध्ये पुन्हा कोरोेनाचा प्रसार होऊ शकतो.