द्राक्ष बागायतदार संकटात

सांगली – कोरोनामुळे देश बंद झाल्याचा फटका जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांनाही बसत आहे. द्राक्ष वाहतुकीला राज्यबंदी झाल्यामुळे द्राक्षे बागेतच पडून राहून खराब होत आहेत. परराज्यातील व्यापारी माल उचलत नाहीत आणि मार्केटमध्ये सुरक्षेच्या कारणासाठी उठाव होत नाही. त्यामुळे द्राक्ष बागायतदार संकटात सापडला आहे.