पुण्यातील पहिल्या कोरोनाबाधित दांपत्याची चाचणी निगेटिव्ह

पुणे – कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या वाढत्या संख्येने पुण्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते; मात्र येथे आढळलेल्या पहिल्या कोरोनाबाधित दांपत्याची चाचणी ‘निगेटिव्ह’ आली आहे. २५ मार्च या दिवशी त्यांचे नमुने पुन्हा एकदा चाचणीसाठी पाठवले जातील. तेही निगेटिव्ह आल्यास या दोघांना घरी सोडण्यात येईल. ९ मार्चला हे दांपत्य कोरोनाबाधित असल्याचे आढळले होते.