गुढीची पूजा करतांना करावयाची प्रार्थना
‘हे ब्रह्मदेवा, हे विष्णु, या गुढीच्या माध्यमातून वातावरणातील प्रजापति, सूर्य आणि सात्त्विक लहरी आमच्याकडून ग्रहण केल्या जाऊ देत. त्यांतून मिळणार्या शक्तीतील चैतन्य सातत्याने टिकून राहू देे. मला मिळणार्या शक्तीचा वापर माझ्याकडून साधनेसाठी केला जाऊ दे’, हीच आपल्या चरणी प्रार्थना !
गुढी खाली उतरवतांना करावयाची प्रार्थना
‘हे ब्रह्मदेवा, हे विष्णु, आज दिवसभरात या गुढीत जी शक्ती सामावली असेल, ती मला मिळू दे. ती शक्ती राष्ट्र आणि धर्म या कार्यासाठी वापरली जाऊ दे’, हीच आपल्याचरणी प्रार्थना !
– श्री. भरत मिरजे (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान)