मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, खासदार इत्यादींनी शिवशंकर पाटील यांचे केवळ शाब्दिक कौतुक न करता त्यांचे अनुकरण करणे अपेक्षित आहे !

‘शेगाव येथील ‘श्री गजानन महाराज संस्थान’चे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकर पाटील यांचे ४.८.२०२१ या दिवशी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाविषयी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहतांना ‘श्री गजानन महाराज संस्थानाच्या कारभाराचे नियोजन आणि व्यवस्थापन हा जगभरातील तज्ञांसाठी अभ्यासाचा विषय राहिला आहे’, असे म्हटले.

चिपी येथील ‘सिंधुदुर्ग विमानतळा’चा कोकणसह संपूर्ण महाराष्ट्राला लाभ होणार ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यातील विविध विमानतळांच्या विकासाविषयी, तसेच त्यातील अडचणी सोडविण्याविषयी ७ ऑक्टोबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची ‘दूरदृश्य प्रणाली’द्वारे बैठक झाली.

‘शाळा पुन्हा बंद करायच्या नाहीत’, या निर्धाराने शिक्षण चालू ठेवू ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

राज्यातील शाळा पुन्हा चालू होण्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थी आणि पालक यांच्याशी संवाद !

मराठवाड्यातील शेतकर्‍यांना तातडीचे साहाय्य सर्वतोपरी पोचवण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश !

मराठवाड्यात अतीवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली; मात्र आम्ही सरकार म्हणून या शेतकर्‍यांच्या पाठीशी आहेत. शेतकर्‍यांना सर्वतोपरी साहाय्य करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

४ ऑक्टोबरपासून शाळा चालू करण्यास मुख्यमंत्र्यांची अनुमती

कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा ४ ऑक्टोबरपासून चालू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनुमती दिली आहे. शालेय शिक्षण विभागाकडून शाळा चालू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे अनुमती मागण्यात आली होती. ही मागणी मुख्यमंत्र्यांनी आता मान्य केली आहे.

नक्षलवादाविषयीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देहली येथे जाणार !

केंद्रीय गृहमंत्रालयाने बोलावलेल्या नक्षलग्रस्त राज्यांतील मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित रहाण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २६ सप्टेंबर या दिवशी देहली येथे दौर्‍यावर जाणार आहेत.

मुंबई-नागपूर ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्पाच्या पाठीशी राज्य सरकार सर्वशक्तीनिशी उभी राहील ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यानंतर मराठवाड्याने मोठ्या संयमाने लढा देत मराठवाड्यालाही मुक्ती मिळवून दिली आहे, तसाच लढा कोरोनामुक्तीसाठी द्यायचा आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

संतपिठामध्ये महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील संतांची शिकवण दिली जाईल ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मराठवाडा येथे संतपीठ स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १७ सप्टेंबर या दिवशी येथे केली. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या मार्गदर्शनाखाली हे संतपीठ चालू केले जाणार असून लवकरात लवकर ते मोठे विद्यापीठ व्हावे…

कोकणात आपत्ती व्यवस्थापनासाठी ३ सहस्र २०० कोटी रुपयांची तरतूद

यामुळे कोकणात नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी हानी अल्प होण्यास साहाय्य होणार आहे.

तिरुमला तिरुपती देवस्थान न्यासाच्या सदस्यपदी मिलिंद नार्वेकर यांची नियुक्ती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशी संवाद साधून मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची शिफारस केल्याची माहिती आहे.