मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव कंत्राटदारांकडून घेतलेली टक्केवारी बनावट आस्थापनांच्या माध्यमातून इतरत्र वळवायचे ! – किरीट सोमय्या, भाजप
भाजपच्या किरीट सोमय्यांची पत्रकार परिषद – महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
भाजपच्या किरीट सोमय्यांची पत्रकार परिषद – महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
या बैठकीनंतर शरद पवार यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या निवासस्थानी बैठकीसाठी गेले. या ठिकाणी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांचे मंत्री बैठकीला उपस्थित होते. सायंकाळी ७.३० वाजता या बैठकीला प्रारंभ झाला.
तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यासमवेत झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य !
राज्यात अनेक वर्षांपासून १९ फेब्रुवारी या दिवशी दिनांकानुसार आणि दुसर्यांदा तिथीनुसार शिवजयंतीचा सोहळा साजरा होतो. २ वेळा शिवजयंती साजरी करण्याविषयी अनेक पक्ष आणि संघटना यांची मतमतांतरे आहेत.
१९ फेब्रुवारीला असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीसाठी शिवज्योत आणि जन्मोत्सव कार्यक्रम यांसाठी विशेष गोष्ट म्हणून अनुमती देण्याची मागणी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली होती.
बजाज उद्योग समुहाचे माजी अध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज (वय ८३ वर्षे) यांचे १२ फेब्रुवारी या दिवशी दुपारी २.३० वाजता वयोमान आणि हृदयाचा विकार यांमुळे निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू होते.
हा निर्णय त्वरित रहित न केल्यास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणास आणि आंदोलनास सर्व स्तरांतून पाठिंबा दिला जाईल, असे सांगण्यात येत आहे.
कित्येक दशकांपासून चालू असलेला माओवाद संपवू न शकणे, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांचे अपयश !
हिंदु जनजागृती समितीसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे आवाहन ! हिंदुबहुल महाराष्ट्रात असे आवाहन का करावे लागते ? प्रशासनाच्या हे स्वतःहून लक्षात का येत नाही ?
नाना पटोलेंसारख्या लोकप्रतिनिधींनी आणि राष्ट्रीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या नेत्याने देशाच्या पंतप्रधानांविषयी अत्यंत खालच्या स्तराला जाऊन वक्तव्य करणे, हे अत्यंत लाजिरवाणे अन् संस्कृतीला काळीमा फासणारे आहे.