पाकचे अफगाणिस्तानात घुसून ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’वर हवाई आक्रमण

पाकने ५ जानेवारीच्या रात्री अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतात हवाई आक्रमण केले. या भागात लपलेल्या ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) या आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्यांना ठार मारण्यासाठी हे आक्रमण करण्यात आले.

आम्ही येत आहोत !

गेल्या काही आठवड्यांपासून पाकिस्तान आणि ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) या आतंकवादी संघटनेमध्ये सशस्त्र संघर्ष चालू आहे. या पार्श्वभूमीवर या संघटनेकडून एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. यात पाक संसद दिसत आहे. एका व्यक्तीच्या हातात कागदाचा तुकडा दिसत आहे.

पाकमध्ये ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ या आतंकवादी संघटनेकडून समांतर सरकार घोषित !

पाकने आतंकवाद पोसला. आता हाच आतंकवाद त्याच्या अस्तित्वावर उठला आहे. त्याने जे पेरले, तेच उगवले आहे, असेच म्हणावे लागेल !

आतंकवद्यांच्या गोळीबारात पाक सैन्याचा मेजर ठार

पाकिस्तानातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ ही आतंकवादी संघटना आणि पाकिस्तानचे सुरक्षादल यांच्यात झालेल्या चकमकीत पाकिस्तानी सैन्याचे मेजर अबिद जमान ठार झाले.

पाकच्या सैन्याच्या कारवाईत तहरीक-ए-तालिबानचे ३३ आतंकवादी ठार

यात पाकच्या सैन्याचे २ कमांडोही ठार झाले.

दोघांच्या भांडणात तिसर्‍याचा लाभ !

अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार येऊन जवळपास दीड वर्ष होत आले आहे. अफगाणिस्तानची आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक स्थिती अत्यंत विदारक आहे. त्यातच ज्या तालिबानच्या मागे अनेक वर्षे पाकिस्तान खंबीरपणे उभा होता, ज्या पाकिस्तानमुळे तालिबानला अफगाणिस्तानची सत्ता मिळवता आली….

गुन्हेगार आणि मानवतावाद (?)

‘गुन्हेगारांना शिक्षा कशी करावी !’, याचा पाया शिवरायांच्या नीतीतून भारतात रचला गेला आहे. केवळ त्याचा अवलंब करणे, ही काळाची आवश्यकता आहे. अभिनव; पण कठोर शिक्षापद्धतींचा अवलंब करून भारत गुन्हेगारी आणि आतंकवाद यांपासून मुक्त करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे !

‘तहरीक-ए-तालिबान-पाकिस्तान’कडून पाक सैनिकाचा शिरच्छेद !

‘करावे तसे भरावे’, हाच नियम पाकच्या सैनिकांना लागू होतो !

‘तेहरीक-इ-तालिबान पाकिस्तान’कडून आतंकवादी आक्रमण होण्याच्या शक्यतेवरून पाककडून राष्ट्रव्यापी इशारा !

‘तेहरीक-इ-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) या जिहादी आतंकवादी संघटनेसमवेत झालेल्या चर्चा निष्फळ ठरल्याने या संघटनेकडून येणार्‍या काळात देशभरात आतंकवादी आक्रमणे होऊ शकतात, असा इशारा पाकिस्तान सरकारने दिला आहे.

नूपुर शर्मा यांच्या हत्येचा कट रचणार्‍यास अटक

आतंकवादविरोधी पथकाने नूपुर शर्मा यांची हत्या करण्याचा कट रचणार्‍या जैश-ए-महंमद आणि तहरीक-ए-तालिबान यांच्याशी संबंधित आतंकवादी नदीम याला अटक केली आहे.