पाकच्या सैन्याच्या कारवाईत तहरीक-ए-तालिबानचे ३३ आतंकवादी ठार

इस्लामाबाद (पाकिस्तान) – तहरीक-ए-तालिबान या आतंकवादी संघटनेने पाकच्या सीमेवरील बन्नू जिल्ह्यातील ‘काऊंटर टेररिझम सेंटर’वर आक्रमण करून काही सैनिकांना कह्यात घेतले होते. त्यांच्या सुटकेसाठी पाकच्या सैन्याने केलेल्या कारवाईत टीटीपीचे ३३ आतंकवादी ठार झाले. यात पाकच्या सैन्याचे २ कमांडोही ठार झाले.

टीपीपीने ३ दिवसांपासून पाकच्या एका मेजरसह ४ सैनिकांना बंदी बनवून ठेवले होते.

या सैनिकांच्या सुटकेसाठी पाकिस्तानने १६ मौलवींचे एक पथक अफगाणिस्तामध्ये चर्चेसाठी पाठवले होते. त्यांचा उद्देश होता की, अफगाणिस्तानमध्ये सत्तेवर असलेले तालिबान सरकार टीटीपीच्या आतंकवाद्यांना शरण येण्यासाठी सिद्ध करील; परंतु हा प्रयत्न अयशस्वी ठरल्यावर पाक सैन्याने कारवाई केली.