आतंकवद्यांच्या गोळीबारात पाक सैन्याचा मेजर ठार

डावीकडे पाकिस्तानी सैन्याचे मेजर अबिद जमान

इस्लामाबाद – या वेळी पाकिस्तानातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ ही आतंकवादी संघटना आणि पाकिस्तानचे सुरक्षादल यांच्यात झालेल्या चकमकीत पाकिस्तानी सैन्याचे मेजर अबिद जमान ठार झाले.

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बन्नू जिल्ह्यामध्ये गेल्या ४८ घंट्यांपासून चालू असलेल्या चकमकीत ६ आतंकवादी ठार झाले आहेत. त्याचवेळी पाकच्या सैन्याचे ४ कमांडो घायाळ झाल्याचे वृत्त आहे. ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’च्या ५० आतंकवाद्यांनी पोलीस ठाण्यावर आक्रमण केले होते. या घटनेनंतर बन्नूमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. तेथील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. अमेरिकेने पाकिस्तानमधील या घटनेचा निषेध केला आहे.