हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘नूतन वर्ष गुढीपाडव्याला साजरे करण्याविषयी’ ‘ऑनलाईन’ कार्यक्रमातून जागृती
‘हिंदु धर्म अन् संस्कृती यांवर होत असलेले आघात आणि ते आघात रोखण्यासाठी हिंदूंनी धर्माभिमान वाढवण्याची आवश्यकता’
‘हिंदु धर्म अन् संस्कृती यांवर होत असलेले आघात आणि ते आघात रोखण्यासाठी हिंदूंनी धर्माभिमान वाढवण्याची आवश्यकता’
कोंढवा बुद्रुक परिसरातील अॅमेझॉनच्या गोदामात ‘मराठी नाही तर अॅमेझॉन नाही’ अशा घोषणा देत तोडफोड केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ८ कार्यकर्त्यांना कोंढवा पोलिसांनी २८ डिसेंबर या दिवशी अटक केली होती. त्यांना न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला प्रतिवर्षी साई मंदिर हे ३१ डिसेंबरला रात्रभर चालू ठेवण्यात येत असते. तीच परंपरा कायम ठेवत या वर्षीसुद्धा शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिर हे ३१ डिसेंबरला साईभक्तांसाठी रात्रभर चालू रहाणार आहे, अशी माहिती शिर्डी संस्थानच्या वतीने देण्यात आली.
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लागू असलेली नियमावली ३१ जानेवारीपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. याविषयीचा शासन निर्णय घोषित करण्यात आला केला आहे.
दरोडा घातल्याप्रकरणी कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयातून त्याच्या २ साथीदारांनी पळवून नेण्याची घटना ३० डिसेंबरला घडली.
गांजा लागवडीच्या प्रस्तावावर तूर्तास कोणताही विचार नाही. लागवड जरी केली, तरी ती केवळ औषधापुरतीच असेल. गांजावरून चालू असलेल्या चर्चा चुकीच्या असून गांजा लागवडीच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
सुप्रसिद्ध संवादिनी (हार्मोनियम) वादक विष्णुबुवा फडके (वय ९८ वर्षे) यांना ३० डिसेंबर या दिवशी सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी देवाज्ञा झाली. ते सनातनच्या साधिका सौ. सुविधा फडके यांचे सासरे होत.
सध्या गोव्यात देशी पर्यटक मोठ्या संख्येने आलेले असल्याने पर्यटन व्यावसायिक आनंदात आहेत; परंतु गोवा पोलिसांना मात्र एका वेगळ्या गोष्टीचा सामना करावा लागत आहे. गोव्यात मजा करण्यासाठी येणारे देशी पर्यटक स्वतःजवळ अमली पदार्थ बाळगतात, असे पोलिसांना आढळून आले आहे.
अयोध्येत मोठ्या प्रमाणात राममंदिराची उभारणी होणार आहे. या संदर्भातील बैठका गोव्यात चालू झाल्या आहेत. याविषयीची एक महत्त्वाची बैठक सत्तरी तालुक्यात नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत राममंदिरासाठी निधी समर्पण अभियानावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
ईश्वर हा विषय सर्वांना समजावा, अनुभवता यावा, यासाठी या सगुण साकार रूपात देव अवतरित झाले, असे श्रीदत्त पद्मनाभ पिठाचे पिठाधीश्वर धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांनी मार्गदर्शनपर आशीर्वचन केले.