सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्रकिनार्‍यावरील जलक्रीडा प्रकार चालू करण्यास अनुमती ! – जिल्हाधिकारी

‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत पर्यटन क्षेत्र, तीर्थस्थळे, प्रार्थनास्थळे चालू करण्यास अनुमती देण्यात आली आहे, तसेच उपाहारगृहे, रेस्टॉरंट यांसह खासगी वाहतुकीसही अनुमती देण्यात आली आहे.

गोव्यात आजपासून १० वी आणि १२ वीच्या वर्गांना प्रारंभ

राज्यातील १० आणि १२ वी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी नियमित वर्गांना २१ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. बहुतेक विद्यालयांनी विद्यार्थ्यांना गटागटांमध्ये विद्यालयात येण्याची सूचना केली आहे

कॅसिनो धक्क्याजवळ बेशिस्तपणे उभ्या केलेल्या वाहनांच्या विरोधात पणजी महानगरपालिकेची कारवाई चालूच

पणजी महानगरपालिकेने कारवाई करतांना ‘पार्किंग निषिद्ध’ असलेल्या विभागात उभी केलेली अनेक दुचाकी वाहने कह्यात घेतली आहेत, तसेच चारचाकी वाहनांना ‘क्लॅम्प’ लावण्यात आले आहेत.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाच्या नोटीसीला २१ दिवसात उत्तर द्यावे लागेल !

गेल्या १० वर्षांत तुमचे उत्पन्न कसे वाढले ?, निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेली माहिती योग्य आहे का ?, याची विचारणा आयकर विभागाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना केली आहे.

‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिकेत योग्य आणि आवश्यक ते पालट करण्याचे निर्मात्यांसह वाहिनीच्या अधिकार्‍यांचे आश्‍वासन !

‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिकेत योग्य आणि आवश्यक ते पालट करण्यात येतील, यांविषयी ग्रामस्थांशी चर्चा करू, असे आश्‍वासन मालिकेचे निर्माता महेश कोठारे, लेखक विठ्ठल ठोंबरे, ‘स्टार प्रवाह’चे अधिकारी यांनी दिले.

मर्यादित संख्येतील वारकर्‍यांच्या उपस्थितीत कार्तिक वारीला अनुमती

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर यंदा २४ नोव्हेंबरला होणारी पंढरपूर कार्तिकी वारी आणि ११ डिसेंबरला होणारी आळंदी वारी ही किमान वारकर्‍यांच्या उपस्थितीत पार पडावी, याविषयी शासन सकारात्मक निर्णय घेईल.

शनिवारवाडा पर्यटकांसाठी तातडीने चालू करावा ! – ब्राह्मण महासंघाची मागणी

‘अनलॉक’ नंतर सर्व धार्मिक तसेच ऐतिहासिक स्थळे उघडण्यास केंद्र सरकारने अनुमती दिली आहे. महाराष्ट्र सरकारनेही ऐतिहासिक स्थळे उघडण्यास अनुमती दिली आहे; मात्र शनिवार वाडा पर्यटकांसाठी अजूनही बंद आहे.

धार्मिक स्थळांमधील ‘व्ही.आय.पी.’ संस्कृती रोखा ! – आयरिश रॉड्रिग्स, अधिवक्ता

जुने गोवे येथे ३ डिसेंबर या दिवशी होणार्‍या फेस्ताच्या निमित्ताने सामूहिक प्रार्थना (नोव्हेना) ‘ऑनलाईन’ स्वरूपात करण्यात येणार असल्याचे घोषित झाले आहे. याप्रसंगी जुने गोवे येथील बासिलिका बॉम जिझस या मुख्य चर्चमध्ये निवडक निमंत्रित ‘व्ही.आय.पीं.’साठी (अतीमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी) प्रार्थनेचे (फिस्ट मास) आयोजन करण्यात आले आहे.

कोल्हापूर महापालिका प्रशासक पद स्वीकारल्यानंतर आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पहिल्याच दिवशी लावली सर्वांना शिस्त !

विलंबाने कामावर आलेल्या कर्मचार्‍यांना कारवाईच्या नोटिसा दिल्या, तर विना‘मास्क’ कामावर आलेल्यांकडून ३ सहस्र २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. महापालिका चौकातील वाहनतळात लावण्यात आलेली वाहने बाहेर काढण्यात आली.

डिसेंबरपासून गोवा शासन मोठ्या प्रमाणावर नोकरभरती करणार : १० सहस्रांहून अधिक रिक्त पदे भरणार

गोवा शासन डिसेंबर मासापासून मोठ्या प्रमाणावर नोकरभरती करणार आहे. शासनाच्या विविध खात्यांमधील सुमारे १० सहस्रांहून अधिक रिक्त पदे भरली जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.