विशाळगडावरील अतिक्रमण हटवून गडाचे संरक्षण आणि संवर्धन करावे, यासाठी रायगड जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

शिवरायांचा वारसा असलेले गडकिल्ले वाचवण्यासाठी हिंदू जनजागृती समितीचे पाऊल !

पालघरमध्ये जमावबंदीच्या अंतर्गत प्रथमच ४७ जणांवर धडक कारवाई

या अंतर्गत बोईसर, आलेवाडी, नांदगावजवळील सांज रिसॉर्ट येथे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, तसेच पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी धाड टाकून ४७ जणांवर कारवाई केली.

हे महाराष्ट्राला लज्जास्पद !

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून यात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असून सर्वाधिक ‘अ‍ॅक्टिव्ह रुग्ण’ असणार्‍या १० जिल्ह्यांपैकी ९ जिल्हे महाराष्ट्रात आहेत.

पुणे येथील तुकाराम बीज सोहळ्यासाठी केवळ ५० लोकांनाच मंदिरात उपस्थित रहाण्याची अनुमती

या वर्षी तुकाराम बीज सोहळ्यासाठी देहू येथील संत तुकाराम महाराज देवस्थानात केवळ ५० लोकांनाच उपस्थित रहाण्याची अनुमती देण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांनी २८ मार्च या दिवशी दिली.

श्री तुळजाभवानी मंदिरात प्रतिदिन केवळ ५ सहस्र भाविकांना प्रवेश

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी प्रतिबंधात्मक आदेश काढले आहेत. या आदेशानुसार श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात प्रतिदिन केवळ ५ सहस्र भाविकांना प्रवेश देण्यात येणार आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रात तापमान वाढ; वाढत्या उष्म्याने नागरिक हैराण !

गेल्या आठवड्यापासून सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत उन्हाच्या तीव्र झळा जाणवत आहेत. बहुतांश तिन्ही जिल्ह्यांमध्ये पारा ३८ अंश पार झालेला आहे.

बंगालमध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यामुळे घायाळ झालेल्या भाजप कार्यकर्त्याच्या आईचा मृत्यू

काही आठवड्यांपूर्वी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे कार्यकर्ते गोपाल मजुमदार यांच्या घरात घुसून त्यांची ८५ वर्षीय आई शोभा मजुमदार यांना मारहाण केली होती. तेव्हापासून त्या घायाळ होत्या. त्यांचे २९ मार्च या दिवशी निधन झाले.

वाराणसी येथील भरत मिलाप मैदानाच्या कडेला लावण्यात आलेल्या रामचरितमानसमधील ओव्यांच्या फलकांच्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य ! – हिंदु जनजागृती समितीचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

नाटीईमली भागातील भरत मिलाप मैदानाच्या कडेला पवित्र रामचरित्रमानसमधील ओव्यांचे फलक आहेत. हे फलक रस्त्याच्या बाजूने असल्यामुळे त्यावर प्राण्यांचे मलमूत्र, रस्त्यावरील धूळ आणि घाण सतत उडत असते. त्यामुळे हे फलक तेथून हटवून दुसर्‍या पवित्र ठिकाणी लावण्यात यावेत..

६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला जबलपूर, मध्यप्रदेश येथील चि. दिवित सार्थक मुक्कड (वय १ वर्ष) !

वाढदिवसाच्या दिवशी ऑनलाईन सत्संगात ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !

 गडचिरोली येथील जंगलात झालेल्या चकमकीत ५ नक्षलवादी ठार

नक्षलवाद्यांची शिबिरे आयोजित केली जातात, यावरूनच तो किती प्रमाणात फोफावला आहे, याची कल्पना येते. अशा शिबिरांच्या आयोजनातून दिवसेंदिवस भयावह होणार्‍या नक्षलवादाला कायमस्वरूपी संपुष्टात आणायला हवे !