पालघर, २९ मार्च (वार्ता.) – राज्यामध्ये २८ मार्चच्या रात्री ८ वाजल्यापासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत. या अंतर्गत बोईसर, आलेवाडी, नांदगावजवळील सांज रिसॉर्ट येथे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, तसेच पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी धाड टाकून ४७ जणांवर कारवाई केली.
पालघर जिल्ह्यात ५ एप्रिलपासून दुकाने, बाजारपेठ, रिक्शा वाहतूक यांच्यावर निर्बंध आहेत, तसेच शाळा-महाविद्यालय पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी काढलेले आहेत.