सातारा जिल्हा व्यापारी संघटनेचा आज भारत बंदला पाठिंबा

‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ या व्यापाऱ्यांच्या संघटनेने जाहीर केलेल्या भारत बंदला सातारा जिल्हा व्यापारी संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा दर्शवण्यात आला आहे.

ग्रामीण भागात ३ सहस्र २०० चौरस फुटांपर्यंतच्या भूखंडावरील बांधकामाला नगररचनाकारांच्या अनुमतीची आवश्यकता नाही ! – हसन मुश्रीफ, ग्रामविकासमंत्री

ग्रामीण भागात १ सहस्र ६०० चौरस फूट पर्यंतच्या भूखंडावरील बांधकामासाठी मालकी कागदपत्रे, मोजणी नकाशा, इमारतीचा आराखडा आणि हे सर्व आराखडे युनिफाईड ‘डी.सी.आर्.’ नुसार असल्याचे परवानाधारक अभियंत्याचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे केवळ ग्रामपंचायतीला सादर करावी लागणार आहेत.

पोहरादेवी (वाशिम) येथे महंतांसह १९ जणांना कोरोनाची लागण

पोहरादेवी येथे वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ झालेल्या गर्दीचे प्रकरण

पुणे पोलिसांकडून अन्वेषण काढून अन्य पोलिसांकडे द्यावे ! – चित्रा वाघ, महिला प्रदेशाध्यक्षा, भाजप

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण

वरळी येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील सदनिका लाटल्याचा गंभीर आरोप, न्यायालयाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश

मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी योजनेच्या लाभार्थी नसतांना वरळी येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील ६ हून अधिक सदनिका लाटल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

मुंबईमध्ये आढळणार्‍या ८० टक्क्यांहून अधिक रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत !- इकबाल चहल, आयुक्त, मुंबई महानगरपालिका

२४ फेब्रुवारी या दिवशी मुंबईमध्ये कोरोनाचे १ सहस्र १६७ रुग्ण आढळले आहेत; मात्र त्यांतील ८३ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी दिली.

श्री सिद्धेश्‍वर देवस्थानचे पंच डॉ. शे.दे. पसारकर (वय ६८ वर्षे) यांचे निधन

श्री सिद्धेश्‍वर देवस्थानचे पंच, तसेच प्रख्यात वीरशैव मराठी साहित्यिक अन् संगमेश्‍वर महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक डॉ. शे.दे. पसारकर (वय ६८ वर्षे) यांचे २४ फेब्रुवारीच्या रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, २ मुली, जावई, नातवंडे, असा परिवार आहे.

राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून वैदिक, वैष्णव, शाक्त किंवा शैव परंपरेतील सन्माननीय व्यक्तीची नियुक्ती करावी ! – साधू-महंतांची राज्यपालांकडे मागणी

सांस्कृतिक मंत्रालय मंत्री तथा राज्यमंत्री किंवा राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून वैदिक, वैष्णव, शाक्त किंवा शैव परंपरेतील सन्माननीय व्यक्तीची नियुक्ती करावी, अशी मागणी साधू-महंतांनी राज्यपालांकडे केली आहे.

१ ते १० मार्च या कालावधीत विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ८ मार्च या दिवशी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार 

विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १ ते १० मार्च या कालावधीत होणार आहे. ८ मार्च या दिवशी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून ९ आणि १० मार्च या दिवशी अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. त्यानंतर अधिवेशन समाप्त होईल.

गृहिणीलाच घरातील सर्व कामे करण्यासाठी उत्तरदायी ठरवता येणार नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

पत्नी म्हणजे एखादी मालमत्ता किंवा वस्तू नाही. घरातील सर्व कामांची अपेक्षा पत्नीकडून करणे चूक आहे. गृहिणीकडूनच घरातील सर्व प्रकारच्या कामांची अपेक्षा केली जाते. ही पती-पत्नीच्या नात्यांमधील असमानता आहे. कोणतेही लग्न हे समानतेच्या तत्त्वावर आधारलेले आहे.