वाई (जिल्हा सातारा) येथील पोलिसांनी दुकाने फोडणार्‍या चोरांची गावातून काढली धिंड !

गणपती आळी येथे असणारी काही दुकाने चोरांनी कटावणीच्या साहाय्याने फोडून ५२ सहस्र ३०० रुपये चोरून नेले होते. पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान करत दरोडेखोरांना अटक केली आणि वाई शहरातून त्यांची धिंड काढली.

(म्हणे) ‘भ्रष्टाचार हा कार्यपद्धतीचा भाग !’ – हेमंत नगराळे, पोलीस महासंचालक

अशा भ्रष्ट पोलीस प्रशासनामुळेच आजवर लक्षावधी लोक न्यायापासून वंचित राहिले, सहस्रो हिंदूंवर अन्याय झाले, शेकडो गुन्हेगार मोकाट सुटले आणि कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत, असेच कुणालाही वाटेल !

(म्हणे) ‘सामाजिक संघटनांमध्ये सत्ता पालटण्याची ताकद यायला हवी !’ – मुक्ता दाभोलकर

सद्यःस्थितीत पुरोगामी विचारांनी कार्य करणार्‍या संघटना सत्तेपर्यंत पोचू शकत नाहीत. त्यामुळे पुरागामी विचारांचे सरकार निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे शोषित अन् वंचित यांसाठी कार्य करणार्‍या सामाजिक संघटनांमध्ये सत्ता पालटण्याची ताकद यायला हवी, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर यांनी व्यक्त केले.

सुश्रुतांच्या काळापासून आयुर्वेदात शस्त्रक्रियांचा उल्लेख आढळतो ! – केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक

‘माझीच उपचारपद्धत श्रेष्ठ’, असे कुणीही म्हणू नये. केंद्रशासनही कुणाची मक्तेदारी (मॉनोपॉली) मोडून काढू इच्छित नाही. एखाद्या औषधाने जर रुग्ण कायमचा बरा होत असेल, तर त्यामध्ये काय वावगे आहे ? आयुर्वेदात पदवी घेणारे किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले यांना शस्त्रक्रिया शिकवली जाते. सुश्रुतांच्या काळापासून आयुर्वेदात शस्त्रक्रियांचा उल्लेख आढळतो.

प्रत्येकाने स्वतःमध्ये शौर्य निर्माण होण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे ! – सुमित सागवेकर

महिलांकडे वाईट दृष्टीने बघणे, त्यांना विनाकारण धक्के देणे अशी विकृत मानसिकता असणार्‍यांना विरोध करण्यासाठी प्रत्येकानेच स्वतःमध्ये शौर्य निर्माण होण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे

१ मार्चपासून सप्ताहातील पाच दिवस सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस धावणार !

अकरा मासांच्या प्रतीक्षेनंतर मध्य रेल्वे सोलापूर विभागातील सोलापूर-पुणे-सोलापूर ही हुतात्मा एक्सप्रेस १ मार्चपासून धावणार असल्याची माहिती वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी दिली.

श्री जोतिबा खेटे आयोजित करू नका ! – जिल्हाधिकार्‍यांचे देवस्थान व्यवस्थापन समितीला पत्र

मानकरी आणि पुजारी यांच्या उपस्थितीत विधीस अनुमती

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे ५ परिवार देवता मंदिरांच्या जिर्णोद्धार कामाचे भूमीपूजन

५ परिवार देवतांच्या मंदिरांचा जिर्णोद्धार आणि श्री विठ्ठल मंदिरातील सभा मंडपाचे सुशोभिकरण या कामांचे भूमीपूजन २५ फेब्रुवारी या दिवशी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

राज्यातील महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची ५०० कोटी रुपयांची अनामत रक्कम पडून !

विद्यार्थ्यांचे पैसे त्यांना परत केले जावेत, यासाठी पत्रक काढूनही त्यांना अनामत रक्कम वेळेत न मिळणे हा विद्यार्थ्यांवरील अन्यायच आहे. यासाठी उत्तरदायी कोण ? विद्यार्थ्यांना पैसे मिळावेत, यासाठी कार्यपद्धत घालणे आवश्यक आहे.

गुरुप्रतिपदेनिमित्त श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात आयोजित केलेले धार्मिक कार्यक्रम रहित : केवळ नित्य पूजा आणि आरती होणार

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मंदिर समितीचा निर्णय