सांगली – ‘तुम्ही आमच्या घरच्या लक्ष्मी आहात आणि लक्ष्मीसारखे सदैव रहावे’, यांसाठी शिराळा शहरातील १८ ते २५ वर्षांच्या युवतींसाठी श्री. अनिल चव्हाण (अण्णा) आणि शिव नंदन बेकरी-स्वीट्स यांच्या वतीने ईश्वरपूर येथील ‘श्री माणकेश्वर चित्रपटगृह’ (बाल्कनी) येथे ७ ते २० मे या कालावधीत ‘द केरल स्टोरी’च्या चित्रपटाच्या विनामूल्य खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी अधिक माहितीसाठी ९०९६१३१५१७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
या संदर्भात अधिक माहिती देतांना श्री. अनिल चव्हाण (अण्णा) म्हणाले, ‘‘आता समाजात आपण जे पहातो, त्या ‘लव्ह जिहाद’ची वास्तविकता अधिकाधिक युवतींपर्यंत पोचवण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. यापूर्वीही ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपट आम्ही प्रायोजित केला होता. समाजासाठी जे जे आपल्याला करणे शक्य होईल, ते ते करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.’’
संपादकीय भूमिकाचित्रपटातून लव्ह जिहादचे भयंकर परिणाम समोर आल्यावर तरी हिंदु मुली त्याला बळी पडण्यापासून स्वतःला वाचवतील का ? |