सांगली येथील हँग ऑन कॅफेचालकास अटक !

सांगली, २२ मे (वार्ता.) – १०० फुटी रस्त्यावरील ‘हँग ऑन कॅफे’त गुंगीचे औषध देऊन मुलीवर बलात्कार करण्यात आला. कॅफेतील कंपार्टमेंट सिद्ध करून संशयितास जागा उपलब्ध करून दिल्याप्रकरणी अनिकेत घाडगे या कॅफेचालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ‘पोक्सो’च्या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. कॅफेतील गैरप्रकारासंदर्भात पडताळणीचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले आहेत. कॅफेचालकाला वाचवण्यासाठी माजी महापौर आणि युवा नेते पोलीस ठाण्यात आले होते. ‘अशा संवेदनशील गुन्ह्यात तरी त्यांनी गांभीर्य दाखवायला हवे होते’, अशी चर्चा नागरिकांतून चालू आहे.