श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या १६ कार्यकर्त्यांची जामिनावर सुटका !

सांगली येथील अनधिकृत ३ कॅफेंची तोडफोड केल्याचे प्रकरण

सांगली, २० मे (वार्ता.) – १७ मे या दिवशी विश्रामबाग येथील ३ अनधिकृत कॅफेंची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या १६ कार्यकर्त्यांना अटक केली होती. त्यांना न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. ही पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना २० मे या दिवशी जिल्हा न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने १६ कार्यकर्त्यांची जामिनावर सुटका केली आहे. या गुन्ह्यात श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष श्री. नितीन चौगुले यांचा समावेश करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे कार्यकर्ते सर्वश्री रणजित चंदन चव्हाण, रोहित मोरे, करण महालिंग म्हेत्रे, विक्रांत कोळी, विनायक आवटी, शंकर वडर, संदीप जाधव, अर्जुन गेजगे, अविनाश भोसले, प्रथमेश सूर्यवंशी, योगेश गुरखा, मारुति घुटूगडे, विलास पवार, सागर सूर्यवंशी, प्रदीप पाटील आणि दिगंबर मनोहर साळुंखे (सांगली) या सर्वांची जामिनावर सुटका झाली आहे.