सांगली येथे कृष्णा नदीची पाणीपातळी ३३ फूट !

कृष्णा नदी

सांगली – सातत्याने होणार्‍या पावसाने कृष्णा नदीची पाणीपातळी २५ जुलैला ३३ फुटांपर्यंत पोचली. ही पाणीपातळी २६ जुलैपर्यंत ३८ फुटांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सांगली शहरातील पाणी येणार्‍या काही उपनगरांमधील १८३ लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असून धरणातील पाणीसाठी ७८ टी.एम्.सी. इतका झाला आहे. त्यामुळे पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे ६ द्वार दीड फुटांनी उचलून विसर्ग चालू केला आहे. सांगलीचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी पूर परिस्थितीची पहाणी केली.