सांगली, २३ जुलै (वार्ता.) – केंद्रीय अर्थसंकल्पात गरीब वर्ग, महिला, युवक आणि शेतकरी यांचा विकास अन् प्रगती यांना पूर्ण प्राधान्य दिले आहे. त्या दृष्टीने अनेक योजना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज घोषित केल्या आहेत. सहकार क्षेत्रासाठी देशव्यापी धोरणही प्रथमच घोषित झाले आहे. यामध्ये महिलांना विकासाच्या अनेक संधी देणार्या योजना घोषित करण्यात आल्या आहेत. त्याचसमवेत युवकांना रोजगार आणि कार्यकौशल्य विकास यांना प्राधान्य देण्यात आले आहे. शेतकर्यांसाठी उत्पादकता वाढीला प्राधान्य देण्यात आले आहे, असे मनोगत भाजपचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी व्यक्त केले.