पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना संपूर्ण महाराष्ट्रात विशेष पोलीस सुरक्षा मिळावी ! – सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप

सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप

सांगली – सांगलीचे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी हे महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, तसेच हिंदु धर्माची जागृती-प्रचार या निमित्ताने दौरे करतात. २९ फेब्रुवारीला मनमाड येथे गेले असता त्यांच्या गाडीचा ताफा अडवून त्यांच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यापूर्वीही अशी आक्रमणे झाली आहेत. तरी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या सुरक्षेसाठी त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात विशेष पोलीस सुरक्षा मिळावी, अशी मागणी सांगलीचे भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.