Uttarkashi Bus Accident : उत्तरकाशी-गंगोत्री महामार्गावर बस दरीत कोसळली ; ३ महिला भाविकांचा मृत्यू, २६ घायाळ

९ जणांवर उत्तरकाशीच्या जिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत. बस दरीत कोसळल्यानंतर ती झाडावर आदळली.

Kuwait Fire : कुवेत येथील भीषण आगीमध्ये ४० भारतियांचा मृत्यू, तर ३० जण घायाळ

मंगफ येथे ६ मजली इमारतीला लागलेल्या आगीमध्ये ४१ जणांचा मृत्यू झाला, तर ३० जण घायाळ झाले. या मृत ४१ पैकी ४० जण भारतीय कामगार आहेत. सर्व घायाळही भारतीयच आहेत.

अल्पवयीन मुलाच्या माता-पित्यांसह मकानदार यांच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ !

अग्रवाल दांपत्यांसह अशफाकची पोलीस कोठडीची समयमर्यादा १० जून या दिवशी संपली. त्यानंतर त्यांना यु.एम्. मुधोळकर यांच्या न्यायालयामध्ये उपस्थित केले होते. न्यायालयाने १४ जून या दिवसापर्यंत पोलीस कोठडीचा निर्णय दिला आहे.

वैजापूर (छत्रपती संभाजीनगर) येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात; ३ जण जागीच ठार !

जांभूळ तांडा येथील राठोड कुटुंब नाशिक येथील धार्मिक स्थळाचे दर्शन घेऊन समृद्धी महामार्गावरून जांभळी तांड्याकडे जात असतांना समृद्धी महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्कॉर्पिओ जीप मालवाहतूक करणार्‍या टेंपोवर पाठीमागून वेगात धडकली.

२ विमानांची धडक थोडक्यात टळली !

दोन विमानांची धडक झाली असती, तर अनर्थ घडला असता ! हे पहाता विमानतळ प्रशासनाने संबंधित कर्मचारी योग्य प्रकारे कर्तव्य बजावतात का ? हे पहायला हवे !

तळेगाव दाभाडे (पुणे) नगर परिषदेच्या मुख्याधिकार्‍यांवर आरोपपत्र प्रविष्ट !

तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन्.के. पाटील यांच्या रक्ताच्या नमुन्याचा अहवाल सकारात्मक (पॉझिटीव्ह) आला आहे. त्यांनी मद्य पिऊन चारचाकी गाडी चालवून अपघात केल्याचे निष्पन्न झाले आहे.

पुणे येथील अग्रवाल पिता-पुत्रांची छोटा राजन याच्या नावाने जिवे मारण्याची धमकी

कोंढवा येथील भूमी प्रकरणात १ कोटी ३२ लाख रुपयांची फसवणूक

Students Drown In Russian River : जळगाव येथील ३ विद्यार्थ्यांचा रशियातील समुद्रात बुडून मृत्यू !

रशियातील यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये वैद्यकीय शाखेत शिकणारे जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थी वोल्खोव्ह नदीकिनारी शहराच्या समुद्रकिनार्‍याजवळ फेरफटका मारत होते. त्या वेळी लाट येऊन त्यांचा त्यात बुडून मृत्यू झाला.

कमकुवत पाया आणि सदोष संरचना यांमुळे फलक पडला !

आतातरी सर्वत्रच्या विज्ञापन फलकांची संरचनात्मक बांधणी केली आहे का ? हे महापालिकेने पडताळायला हवे !