वैजापूर (छत्रपती संभाजीनगर) येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात; ३ जण जागीच ठार !

वैजापूर – जांभूळ तांडा येथील राठोड कुटुंब नाशिक येथील धार्मिक स्थळाचे दर्शन घेऊन समृद्धी महामार्गावरून जांभळी तांड्याकडे जात असतांना समृद्धी महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्कॉर्पिओ जीप मालवाहतूक करणार्‍या टेंपोवर पाठीमागून वेगात धडकली. या अपघातात स्कॉर्पिओ वाहनातील आई-वडील आणि मुलगी ठार झाले, तर इतर ४ जण घायाळ झाले आहेत. ही घटना जांबरगाव पथकर नाक्याजवळ ७ जून या दिवशी दुपारी ३.३० वाजता घडली. अपघातातील मृत जांभळी तांडा, बिडकीन येथील रहिवासी आहेत. अपघातानंतर महामार्गावरील साहाय्य केंद्रातील यंत्रणेने घायाळ झालेल्यांना वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. बनसिंग राठोड, कमला राठोड, कुमारी जाधव अशी अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत, तर रामसिंह राठोड, शीतल राठोड, मयंक जाधव, नेहा राठोड अशी घायाळ झालेल्यांची नावे आहेत.