Uttarkashi Bus Accident : उत्तरकाशी-गंगोत्री महामार्गावर बस दरीत कोसळली ; ३ महिला भाविकांचा मृत्यू, २६ घायाळ

वाराणसी – उत्तरकाशीतील गंगोत्री महामार्गावर ११ जूनला रात्री उशिरा एक बस  ६० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात ३ महिला भाविकांचा मृत्यू झाला, तर २६ जण घायाळ झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका, पोलीस, सुरक्षादलाचे सैनिक, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि वन विभागाचे पथक घटनास्थळी पोचले.

गंभीर घायाळ झालेल्या १७ जणांना ऋषिकेश येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे, तर ९ जणांवर उत्तरकाशीच्या जिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत. बस दरीत कोसळल्यानंतर ती झाडावर आदळली.