Nagpur Blast : नागपूर येथे स्फोटके बनवणार्‍या आस्थापनात मोठा स्फोट !

५ कामगारांचा मृत्यू, तर ८ ते १० कामगार घायाळ

घटनास्थळ

नागपूर – जिल्ह्यातील वाडीपासून काही अंतरावर असलेल्या धामनाजवळील स्फोटके बनवणार्‍या चामुंडा आस्थापनात दुपारी १२.३० वाजता मोठा स्फोट झाला. त्यात ५ कामगारांचा मृत्यू झाला, तर ८ ते १० कामगार घायाळ झाले. मृतांमध्ये ४ महिलांचा समावेश आहे. घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.