सरसकट दळणवळण बंदीचा निर्णय हा पूर्वपदावर येत असलेल्या अर्थचक्राला खीळ घालणारा ठरेल ! – पुणे व्यापारी महासंघ
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढील ८ ते १० दिवसांत परिस्थिती पाहून दळणवळण बंदीचा निर्णय घेतला जाईल, असे सूतोवाच केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढील ८ ते १० दिवसांत परिस्थिती पाहून दळणवळण बंदीचा निर्णय घेतला जाईल, असे सूतोवाच केले आहे.
असे वासनांध पोलीस जनतेचे रक्षण कसे करणार ?
इंदापूर तालुक्यात १०४ शाळा असून त्यात १८ सहस्र ६१० विद्यार्थी आहेत. त्यातील ३३ शाळा पहिल्या दिवशी चालू झाल्या आणि त्यामध्ये १ सहस्र ३८८ विद्यार्थी उपस्थित होते.
२२ नोव्हेंबरच्या रात्री नीलेश बाविस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रमंडळींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रात्री विलंबापर्यंत ही मेजवानी चालू असल्याने काही नागरिकांनी खारघर पोलीस ठाण्यात दूरध्वनीद्वारे तक्रारी केल्या.
यंदा आळंदीची कार्तिकी यात्रा ८ ते १४ डिसेंबर या कालावधीत आहे. तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये प्रतिवर्षी कार्तिकी एकादशीला ७ ते ८ लाख भाविक आळंदीत येत असतात.
कोरोनाच्या काळात जनतेवर लादलेली वाढीव वीजदेयके तातडीने रहित करा, अशी मागणी करत ‘ग्राहकांचे वीजमीटर खंडित करण्यासाठी आलात, तर खबरदार’, अशी चेतावणी आमदार गणेश नाईक यांनी महावितरणला दिली आहे.
कोरोना काळात रुग्णांना सकस आहार पुरवणार्या कोरेगाव (जिल्हा सातारा) येथील अन्नपूर्णा सौ. उज्ज्वला लिनेश निकम यांना पुणे येथील ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशन यांच्या वतीने समाजसेविका उज्वला निकम यांचा नवदुर्गा गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
कोकण रेल्वेमार्गावरून धावणार्या गाडीची धडक बसून तालुक्यातील बौद्धवाडी, हुंबरठ येथील रेल्वेमार्गावर २१ नोव्हेंबरला सकाळी एका महिलेचा मृत्यू झाला. मृतदेह छिन्नविछिन्न झाल्याने महिलेची ओळख पटलेली नाही.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संचालक, सांगली जिल्हा सराफ समितीचे मार्गदर्शक, पंडित ज्वेलर्सचे किशोर पंडित यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने २० नोव्हेंबर या दिवशी निधन झाले.
राज्य सरकारने कोरोनाच्या काळात वीजदेयक माफ करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु सरकारने पैसे नाहीत, हे कारण सांगत त्यांचा शब्द फिरवला आहे.