२ जण घायाळ, वाहनांची मोठी हानी
नागपूर – सीताबर्डीतील गोवारी उड्डाणपुलावर अपघात झाला असून जवळपास १२ ते १५ वाहने एकमेकांना धडकली. यात २ जण घायाळ झाले आहेत. यात वाहनांचीही मोठी हानी झाली आहे. २ घंटे वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी वाहतूक बंद करून रस्ता मोकळा केला. ही घटना ३ डिसेंबर या दिवशी सकाळी ११.३० वाजता घडली.
वामन नेवारे चारचाकीतून बर्डीच्या गोवारी उड्डाणपुलावरून जात असतांना समोरील चारचाकीने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे मागे असणारी वामन नेवारे यांची चारचाकी पुढील वाहनावर आदळली. त्यानंतर उड्डाणपुलावरून मागून सुसाट जाणारी वाहने एकमेकांवर धडकू लागली. यामध्ये काही रिक्शा, कार, आयशर ट्रक यांसह एका शाळेच्या गाडीचा समावेश आहे.