सरसकट दळणवळण बंदीचा निर्णय हा पूर्वपदावर येत असलेल्या अर्थचक्राला खीळ घालणारा ठरेल ! – पुणे व्यापारी महासंघ

पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढील ८ ते १० दिवसांत परिस्थिती पाहून दळणवळण बंदीचा निर्णय घेतला जाईल, असे सूतोवाच केले; मात्र सरसकट दळणवळण बंदी लागू करण्याचा विचार हा पूर्वपदावर येत असलेल्या अर्थचक्राला खीळ घालणारा ठरेल, असे मत शहरातील व्यापार्‍यांनी व्यक्त केले आहे.

‘मास्क’ नसल्यास दुकानात प्रवेश देऊ नये, नियमित निर्जंतुकीकरण करण्यात यावे, अशा सूचना व्यापार्‍यांना दिल्या असल्याचे पुणे व्यापारी महासंघाचे सचिव महेंद्र पितळीया यांनी सांगितले. कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी कठोर निर्बंध निश्‍चित लादावेत मात्र अजूनही व्यापार तेवढ्या गतीने होत नसल्याने सरसकट दळणवळण बंदीचा प्रस्ताव कुणाच्याही हिताचा नसल्याचे मत ‘दी पूना मर्चंट्स चेंबर, मार्केटयार्डचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी व्यक्त केले.