सातारा येथील गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद !

सातारा येथील गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद !

असे शिक्षणाधिकारी शिक्षण खात्याला कलंकच आहेत, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. अशांवर कठोर कारवाई आणि समाजात छी थू झाली, तरच पुन्हा असे करण्याचे कुणाचे धाडस होणार नाही !

संभाजीनगर येथे नियम तोडणार्‍या रिक्शाचालकाला आमदार अंबादास दानवे यांनी श्रीमुखात लगावली !

संभाजीनगर येथे नियम तोडणार्‍या रिक्शाचालकाला आमदार अंबादास दानवे यांनी श्रीमुखात लगावली !

शहरातील क्रांती चौक भागात वाहतुकीचा खोळंबा झाल्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी शिवसेनेचे आमदार डॉ. अंबादास दानवे रस्त्यावर उतरले. या वेळी नियम तोडणार्‍या रिक्शाचालकाचा बेशिस्तपणा पाहून त्यांनी त्याच्या श्रीमुखात लगावली.

सातारा जिल्ह्यातील २० शासकीय रुग्णालयांमध्ये होणार ‘मेडिकल ऑक्सिजन’ची निर्मिती ! – शेखर सिंह, जिल्हाधिकारी

सातारा जिल्ह्यातील २० शासकीय रुग्णालयांमध्ये होणार ‘मेडिकल ऑक्सिजन’ची निर्मिती ! – शेखर सिंह, जिल्हाधिकारी

जिल्ह्यातील २० शासकीय रुग्णालयांमध्ये ‘मेडिकल ऑक्सिजन’ची निर्मिती केली जाणार आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेसाठी जिल्हा प्रशासनाने ही पूर्वसिद्धता केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.

जावळी तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

जावळी तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

महान हिंदु संस्कृती असलेल्या भारतात महिलांसमवेत अल्पवयीन मुलीही असुरक्षित असणे चिंताजनक ! बलात्कार करणार्‍यांना त्वरित कठोर शिक्षा न दिल्याचाच हा परिणाम आहे !

सनातनचे साधक आणि नाक-कान-घसा तज्ञ आधुनिक वैद्य नितीन कोठावळे यांचे निधन : नवे पारगाव परिसरावर शोककळा

सनातनचे साधक आणि नाक-कान-घसा तज्ञ आधुनिक वैद्य नितीन कोठावळे यांचे निधन : नवे पारगाव परिसरावर शोककळा

सनातन संस्थेचे साधक आणि नाक-कान-घसा तज्ञ आधुनिक वैद्य नितीन प्रभाकर कोठावळे (वय ५९ वर्षे) यांचे २९ जून या दिवशी दीर्घ आजाराने दुपारी १२.१५ वाजता त्यांच्या रहात्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आधुनिक वैद्य कौशल, दोन भाऊ, दोन भावजया, एक पुतण्या आणि एक पुतणी असा परिवार आहे.

आंबिल-ओढ्यातील नागरिकांचे ठिय्या आंदोलन !

आंबिल-ओढ्यातील नागरिकांचे ठिय्या आंदोलन !

वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि आंदोलक यांच्या आरोपांनंतर सुप्रिया सुळे यांना माध्यमांनी प्रश्न विचारले. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माहिती कुठून मिळाली त्याचा काही पुरावा आहे का ? मला सगळे पुरावे द्या, ऑडिओ क्लिप द्या. मी स्वतः तक्रार करीन.

कोरोनाच्या उपचारासाठी रुग्णालयांनी घेतलेले अधिकचे देयक परत न केल्यास रुग्णालयांसमोर ठिय्या आंदोलन ! – संजय पाटील, खासदार, भाजप

कोरोनाच्या उपचारासाठी रुग्णालयांनी घेतलेले अधिकचे देयक परत न केल्यास रुग्णालयांसमोर ठिय्या आंदोलन ! – संजय पाटील, खासदार, भाजप

संजय पाटील पुढे म्हणाले, ‘‘१५ दिवसांत या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून रुग्णालयाने पैसे परत द्यावे, ही आग्रही भूमिका असणार आहे.

नालासोपारा (जिल्हा पालघर) येथे कत्तलीसाठी नेण्यात येणार्‍या २५ गोवंशियांची पोलिसांकडून सुटका

नालासोपारा (जिल्हा पालघर) येथे कत्तलीसाठी नेण्यात येणार्‍या २५ गोवंशियांची पोलिसांकडून सुटका

गोमाता आणि गोवंश यांचे रक्षण करणार्‍या पोलिसांचे अभिनंदन ! राज्यात गोवंशियांच्या कत्तलीच्या वारंवार होणार्‍या घटना रोखण्यासाठी पोलीस अन् प्रशासन यांनी गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावीपणे कार्यवाही करणे अपेक्षित आहे.

अमरावती येथील शिवसेनेच्या तिवसा शहरप्रमुखांची निर्घृण हत्या !

अमरावती येथील शिवसेनेच्या तिवसा शहरप्रमुखांची निर्घृण हत्या !

जिल्ह्यातील तिवसा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणार्‍या राष्ट्रीय महामार्गावरील एका वाईन बार परिसरात २६ जूनच्या रात्री शिवसेनेचे तिवसा शहरप्रमुख अमोल पाटील (वय ३४ वर्षे) यांच्या डोळ्यांत मिरचीपूड फेकून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली.

संभाजीनगर येथे मोठ्या बहिणीची छेड काढणार्‍या टवाळखोराला धाकट्या बहिणीने दिला चोप !

संभाजीनगर येथे मोठ्या बहिणीची छेड काढणार्‍या टवाळखोराला धाकट्या बहिणीने दिला चोप !

महिलांनो, अशा प्रकारे टवाळखोरांना धडा शिकवून सुरक्षित रहा !