कोरोनाच्या उपचारासाठी रुग्णालयांनी घेतलेले अधिकचे देयक परत न केल्यास रुग्णालयांसमोर ठिय्या आंदोलन ! – संजय पाटील, खासदार, भाजप

(प्रतिकात्मक छायाचित्र)

सांगली, २८ जून (वार्ता.) – कोरोनाच्या उपचारासाठी भरती झालेल्या अनेक रुग्णांनी जिल्ह्यातील रुग्णांकडून मनमानी देयक घेतल्याच्या तक्रारी येत आहेत.  रुग्णालयांकडून अधिक देयक आकारण्याविषयी जिल्हाधिकार्‍यांसमवेत लोकप्रतिनिधींची बैठक घेऊ. त्यानंतर पैसे परत करण्यासाठी वेळ देऊ; मात्र यानंतरही संबंधित रुग्णालयांकडून रुग्णांचे पैसे परत न मिळाल्यास रुग्णालयांसमोर ठिय्या आंदोलन करू, अशी चेतावणी भाजपचे खासदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संजय पाटील पुढे म्हणाले, ‘‘१५ दिवसांत या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून रुग्णालयाने पैसे परत द्यावे, ही आग्रही भूमिका असणार आहे; अन्यथा रुग्णांच्या नातेवाइकांना घेऊन संबंधित त्या-त्या रुग्णालयांच्या समोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल.’’