सातारा जिल्ह्यातील २० शासकीय रुग्णालयांमध्ये होणार ‘मेडिकल ऑक्सिजन’ची निर्मिती ! – शेखर सिंह, जिल्हाधिकारी

सातारा, २९ जून (वार्ता.) – जिल्ह्यातील २० शासकीय रुग्णालयांमध्ये ‘मेडिकल ऑक्सिजन’ची निर्मिती केली जाणार आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेसाठी जिल्हा प्रशासनाने ही पूर्वसिद्धता केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
जिल्हाधिकारी शेखर सिंह पुढे म्हणाले, ‘‘कूपर कॉर्पाेरेशन प्रा.लि. यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांशी केलेल्या करारानुसार, नाममात्र भाडेतत्त्वावर सातारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये ‘जनरेटर सेट’ बसवण्याचे काम पूर्ण केले आहे. अजून ५ ‘जनरेटर सेट’ बसवण्यात येणार आहेत. ‘ऑक्सिजन’ निर्मितीसाठी लागणारे संचही कूपर कॉर्पाेरेशन प्रा.लि. यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून बसवले आहेत.’’