गणपतीपुळे तीर्थक्षेत्राचे सुशोभीकरण होणार !

निधीमुळे मंदिराचे सुशोभीकरण,वाहनतळ,भक्तनिवास, पर्यटकांची सुरक्षितता  तीर्थक्षेत्रांकडे जाणारे रस्ते, पथदीप, मंदिर परिसर, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृहे आदी सोयी उपलब्ध होणार आहेत.

दुकानांवरील पाट्या मराठीत न लावणार्‍या दुकानदारांना नगर परिषद प्रशासनाकडून कारवाई करण्याची चेतावणी

आता केवळ सूचना, चेतावणी आणि कागदी घोडे नाचवण्यापेक्षा प्रशासनाने कायदेशीर कारवाई करून मराठीची गळचेपी थांबवावी, ही मराठीप्रेमींची अपेक्षा !

‘वन्दे  भारत’ मंगळुरूपर्यंत चालवण्यास आमचा विरोध ! – जयवंत दरेकर, कोकण विकास समितीचे अध्यक्ष

वन्दे भारत एक्सप्रेसच्या प्रस्तावित एकत्रिकरणास ठाम विरोध असून या सेवेचा  मंगळुरूपर्यंत विस्तार केल्यास मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा विभागातील प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

‘मुख्यमंत्री माझी शाळा’मध्ये आगाशे विद्यामंदिर रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम

नेहमीच विविध उपक्रम शाळेत होतात. शिवाय संगणक शिक्षण, सुसज्ज वाचनालय, आनंददायी परिसर, सुरेख उद्यान, हुशार विद्यार्थी अशा सर्वच गोष्टीत अग्रेसर असल्याने या शाळेने बाजी मारली.

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाचे रक्तसंकलनाचे कार्य गौरवास्पद ! – उद्योगमंत्री उदय सामंत

‘‘संस्थानने मोठ्या संख्येने रक्त संकलन करून राज्याची साधारण ४० दिवसांची गरज भागली आहे. यातून महाराजांनी त्यांचा ‘तुम्ही जगा, इतरांना जगवा’, हा उपदेश प्रत्यक्षात आणला आहे.’’

महावितरणचे प्रधान यंत्रचालक संतोष कुलकर्णी सेवानिवृत्त

मागील वर्षी प्रशासनाने वीज कंपनीच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून त्यांना उत्कृष्ट यंत्रचालक हा मानाचा पुरस्कार देण्यात आला होता.

मातृभाषेतून आकलन चांगले होते ! – डॉ. सुधीर एम्. देशपांडे

कुसुमाग्रज यांनी त्यांच्या साहित्यातून क्रांतीची प्रेरणा सर्वांच्यात निर्माण केली. त्यांनी मराठी भाषेची थोरवी आपल्या कवितेतून वर्णन केली आहे.

रत्नागिरीत ४ मार्चला ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’

हिंदूंच्या भूमी बळकावणारे विभागीय वक्फ बोर्डास रत्नागिरीत मान्यता का दिली जाते ? याचा जाब विचारण्यासाठी या मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे.

गडांच्या जतन आणि संवर्धनाकरता निधीची तरतूद हवी !

अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये त्यांनी गड जतन आणि संवर्धनाकरता निधी उपलब्ध केला जाईल, असे आश्वासित केले.

उद्या पेढांबे (ता. चिपळूण) येथे ग्रामदेवता श्री सुकाईदेवी मंदिराचा भव्य उद्घाटन सोहळा

माघ शुक्ल द्वादशी (२१ फेब्रुवारी) ते माघ शुक्ल त्रयोदशी (२२ फेब्रुवारी २०२४) या कालावधीत श्री सुकाईदेवी मंदिराचा जीर्णोद्धार, प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा धार्मिक विधीपूर्वक साजरा होत आहे. या निमित्ताने . . .