ससून रुग्णालयात कार्यान्वित असलेल्या ‘कोड ब्ल्यू’मुळे अनेक रुग्णांना जीवदान !

या यंत्रणेमुळे आपत्कालीन स्थितीत १२० सेकंदांमध्ये रुग्णाला उपचार मिळाल्याने मागील ६ मासांत अनुमाने ५०० रुग्णांचे प्राण वाचले आहेत. रुग्णालयामध्ये ६ मासांत ७८८ वेळा यंत्रणा वापरली.

वर्दळीच्या अनेक रेल्वेस्थानकांवर रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी नियुक्त नसल्याने सुरक्षाव्यवस्था वार्‍यावर !

रेल्वेस्थानकावर पोलीस कर्मचारी नसणे म्हणजे प्रवाशांच्या जिवाशी एक प्रकारचा खेळच आहे. कर्मचार्‍यांना नियुक्त करण्यामध्ये हलगर्जीपणा करणारे दायित्वशून्य अधिकारी काय कामाचे ?

पुणे येथे नदीपात्रात कचरा टाकल्याने फटाका स्टॉलधारकांवर महापालिकेची दंडात्मक कारवाई !

आजपर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम !

दाऊद टोळीतील गुंड सलीम कुत्ता ६ वर्षांपासून येरवडा कारागृहात असल्याची कारागृह प्रशासनाची माहिती !

मुंबई बाँबस्फोट प्रकरणात सलीम कुत्ता याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. येरवडा कारागृहात भरती करण्यापूर्वी सलीम याला नाशिक कारागृहात ठेवण्यात आले होते. त्या वेळी तो १० दिवस संचित रजेवर (पॅरोल) मुक्त होता.

बांगलादेशींना शासकीय कागदपत्रे मिळवून देणार्‍यांवर कारवाई करा !

अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना ते लक्षात येत नाही का ?

पुणे येथून आणखी एक आतंकवादी कह्यात !

पुण्‍यातील गुलटेकडी परिसरात रहाणार्‍या तरुणाकडेही ‘एन्.आय.ए.’ने चौकशी केली आहे. एन्.आय.ए.कडून आज दक्षिण भारतातील १९ ठिकाणी शोध चालू आहे.  महाराष्‍ट्रातील अमरावती येथेही धाड टाकण्‍यात आली आहे.

पुणे येथे सवाई गंधर्व महोत्सवात आग

कार्यक्रमाच्या मंडपाच्या मागील बाजूस ‘फोटोगॅलरी’ असलेल्या ठिकाणी ‘शॉर्ट सर्किट’मुळे आग लागली आहे. कार्यक्रम चालू असतांना आग लागल्याने कार्यक्रमात प्रेक्षकांची तारांबळ उडाली होती.

महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये राज्यात पुणे चौथ्या स्थानी !

केवळ गुन्हे नोंद करून न थांबता न्यायालयात खटला जलद गतीने चालवण्यासह आरोपींना शिक्षा होण्यासाठीही तितक्याच तत्परतेने कारवाई होणे आवश्यक आहे.

रुग्णालयातील परिचारकांच्या संपामुळे ससूनमध्ये दिवसभरात केवळ आठच शस्त्रक्रिया !

या संपामुळे रुग्णांची झालेली हानी कोण आणि कशी भरून काढणार ?

पुणे येथे कपडे धुण्यासाठी घरी बोलावून अल्पवयीन मुलीवर ३ वेळा अत्याचार !

अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांचे प्रमाण रोखण्यासाठी पोलिसांनी ठोस आणि कठोर उपाययोजना करावी ! तरच असे प्रकार थांबतील !