(‘कोड ब्ल्यू’ यंत्रणा म्हणजे रुग्णालयामध्ये एखाद्यास हृदयविकाराचा झटका आल्यास अथवा इतर वैद्यकीय आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास रुग्णावर त्वरित उपचार करण्यासाठी उपलब्ध पथक. )
पुणे – आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास उपचार करण्यासाठी ‘कोड ब्ल्यू’ यंत्रणा कार्यान्वित केली आहे. राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये सर्वप्रथम ससूनमध्ये ही यंत्रणा चालू झाली. या यंत्रणेमुळे आपत्कालीन स्थितीत १२० सेकंदांमध्ये रुग्णाला उपचार मिळाल्याने मागील ६ मासांत अनुमाने ५०० रुग्णांचे प्राण वाचले आहेत. रुग्णालयामध्ये ६ मासांत ७८८ वेळा यंत्रणा वापरली. त्यांपैकी ४९४ रुग्णांना वाचवण्यात यश आले आहे. रुग्णाला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर पहिल्या १० मिनिटांत उपचार मिळाल्यास रुग्ण वाचण्याची शक्यता अधिक असते असा विचार करून ‘कोड ब्ल्यू’ यंत्रणा चालू केली आहे. या यंत्रणेसाठी विशेष पथक सिद्ध केले असून ते २४ घंटे उपलब्ध आहे.