‘रामराज्य’ हे आमचे स्वप्न; मंदिर ही आमची अस्मिता ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

आपले स्वप्न ‘रामराज्या’चे आहे आणि मंदिर ही आमची अस्मिता आहे. श्रीराम मंदिराच्या उभारणीमुळे देशात यापुढे रामराज्याची संकल्पना पहायला मिळेल. समाजातील सोशित, पीडित, वंचित आहे, त्याला ज्या राज्यामध्ये महत्त्व मिळते, त्याचा आवाज ऐकला जातो, त्याला ‘रामराज्य’ असे म्हटले जाते.

Dabholkar Murder Case: हत्येच्या दिवशी रक्षाबंधन असल्याने दोघेही आरोपी त्यांच्या बहिणींसमवेतच असल्याची बहिणींची न्यायालयात साक्ष !

दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत २० साक्षीदार सादर केले होते. त्यांची साक्ष आणि उलटतपासणी पूर्ण झाली आहे.

प्रभु श्रीरामचंद्रांविषयी वादग्रस्त विधान करणारे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा नोंद करावा !

वाल्मीकि रामायणातील श्लोकाचा चुकीचा अर्थ काढून हिंदुद्वेषी जितेंद्र आव्हाड समस्त हिंदु समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न करत आहेत.

पुणे येथे भाजपचे आमदार सुनील कांबळे यांच्याकडून पोलीस हवालदाराला मारहाण !

‘उद्घाटन कार्यक्रमाला माझे नाव का नाही टाकले ?’, असे विचारत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे वैद्यकीय कक्षाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र सातव यांना मारहाण केली होती. नंतर त्यांनी एका पोलीस कर्मचार्‍याच्या कानशिलात लगावली.

आमदार रोहित पवार यांच्या ‘बारामती ॲग्रो कंपनी’वर केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून धाडी !

५ जानेवारीला पुणे, बारामती आणि इतर ठिकाणी ईडीकडून धाडी घालण्यात आल्या. ईडीच्या पथकाने एकूण ६ ठिकाणी धाडी चालू केल्याची माहिती मिळाली आहे. ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई केली आहे.

‘महानंद’ दूध डेअरी ‘राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डा’कडे जाणार !

सध्या ९३७ कामगार आहेत. त्यांपैकी ५६० कामगारांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये ‘स्वेच्छा’ निवृत्तीकरता अर्ज केले आहेत; मात्र अद्यापही त्याविषयी निर्णय झालेला नाही. कर्मचार्‍यांचे वेतन वेळेत देता येत नाही.

पुणे येथील गेल्या ३ वर्षांतील विनाअनुमती बांधकामांचा आढावा घेणार ! – विक्रम कुमार, आयुक्त तथा प्रशासक

हा आढावा घेण्यास ३ वर्षे का लागली ? इतकी वर्षे प्रशासन झोपा काढत होते का ? त्या त्या वेळीच हा आढावा का घेतला नाही, याचेही कारण आयुक्तांनी सांगावे !

राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलने !

देवतांविषयी अभद्र बोलणार्‍यांना जनता येत्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवेल !

पिंपरी (पुणे) येथे अग्नीप्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देण्यास व्यावसायिकांकडून टाळाटाळ !

महत्त्वपूर्ण असणार्‍या अग्नीप्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देण्यास टाळण्यातून व्यावसायिकांची असंवेदनशीलताच दिसून येते !

पुणे येथे सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्यास ५०० रुपये दंड !

स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, हे प्रवाशांना सांगावे लागणे, तसेच त्यासाठी दंड लागू करणे म्हणजे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम !