वर्सोवा पुलावर ३ मासांत खड्डे पडल्‍याने वाहतूकमंत्री नितीन गडकरी संतप्‍त !

नव्‍याने बांधलेल्‍या वर्सोवा पुलावर ३ मासांत खड्डे पडल्‍याने केंद्रीय रस्‍ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी संतप्‍त झाले. त्‍यांनी महामार्ग प्राधिकरणाच्‍या अधिकार्‍यांना खडसावत संबंधित ठेकेदाराला काळ्‍या सूचीत टाकण्‍याचे आदेश दिले आहेत.

२ सहस्र ३७८ खड्डे बुजवले ! – एम्.एम्.आर्.डी.ए.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एम्.एम्.आर्.डी.ए.) मुंबई आणि उपनगरांतील रस्‍त्‍यांवरील २ सहस्र ३७८ खड्डे बुजवल्‍याचे सांगितले आहे. मेट्रो, तसेच अन्‍य प्रकल्‍प यांच्‍या कामामुळे रस्‍त्‍यांची दुरवस्‍था झाली होती.

बदलापूर ते बारवी रस्‍त्‍यावरील खड्डे कि खड्ड्यात रस्‍ता ?

बदलापूर ते बारवी या २३ किलोमीटर अंतरापर्यंतचे खड्डे बुजवण्‍यासाठी महाराष्‍ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एम्.आय.डी.सी.ने) कोट्यवधी रुपये खर्च केले; पण यंदा पुन्‍हा तेेथे मोठमोठे खड्डे पडले.

मुंबई-गोवा महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था !

१३ वर्षांपासून महामार्गाची स्थिती अशीच असणे हे सर्वपक्षियांना लज्जास्पद नव्हे का ?

सिंधुदुर्ग : तेंडोली येथे उज्ज्वला नदीवर असलेल्या पुलावरील खड्डे ग्रामस्थांनी बुजवले !

पावसाळ्यात पुलावर पडलेले खड्डे ग्रामस्थांना बुजवावे लागणे प्रशासनाला लज्जास्पद ! 

खड्ड्यांना उत्तरदायी ठेकेदार आणि अधिकार्‍यांवर सदोष मनुष्‍यवधाचा गुन्‍हा नोंद करा !

कल्‍याण-डोंबिवली महानगरपालिकेचे क्षेत्र असलेल्‍या कल्‍याण, डोंबिवली, ठाकुर्ली, अंबिवली, टिटवाळा या परिसरांतील रस्‍त्‍यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्‍यामुळे वाहनचालक आणि नागरिक यांना त्‍यातून कसरत करत मार्गक्रमण करावे लागत आहे.

कल्‍याण येथे खड्डे चुकवतांना दुचाकीस्‍वाराचा मृत्‍यू !

आणखी किती जणांचे मृत्‍यू झाल्‍यावर प्रशासन आणि सरकार ‘खड्डेमुक्‍त महाराष्‍ट्र’ करणार आहे ?

सिंधुदुर्ग : दोडामार्ग तालुक्यातील रस्त्यांची दयनीय स्थिती

शिरवल नदी ते कोलझर नदी या रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे  रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ता ? हाच प्रश्न निर्माण होत आहे. त्रासाला कंटाळून ग्रामस्थांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला ‘रस्ताबंद’ आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे.

निविदा प्रक्रियेतील आरोपांमुळे पुणे शहरातील अद्याप ६० किलोमीटर रस्‍त्‍यांची दुरुस्‍ती अपूर्ण !

पावसाळा तोंडावर आला असतांनाही निविदा प्रक्रियेवर झालेल्‍या आरोप-प्रत्‍यारोपातून अनेक रस्‍त्‍यांची कामे प्रलंबित राहिली आहेत. शहरातील १०० किलोमीटर लांबीच्‍या रस्‍त्‍यांपैकी केवळ ४० किलोमीटर रस्‍त्‍यांची दुरुस्‍ती झाली आहे.

पालखी मार्गावरील अडथळे दूर करण्‍याची भाविक आणि नागरिक यांची मागणी !

अशी मागणी का करावी लागते ? संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांना दिसत नाही का ? पालखी मार्ग कायमचाच चांगला रहाण्‍यासाठी अधिकार्‍यांनी प्रयत्न करावेत.