पालखीमार्गाची दुरवस्था !
भोसरी – संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर पडलेला सिमेंट-काँक्रीटचा राडारोडा, तसेच रस्त्यावर न भरलेल्या चरींमुळे पडलेले खड्डे आणि पालखीच्या मार्गावरील अन्य अडचणी यांमुळे वारकर्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. पालखीमार्गावरील असुविधा दूर करण्याची मागणी भाविक आणि नागरिक यांनी केली आहे. या असुविधेमुळे पालखीमार्गावर वारकरी आणि वाहने यांना अडथळा होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने पालखीमार्गाची पाहणी करून मार्गातील अडथळे दूर करावेत, तसेच पालखीमार्गावर उभारलेल्या विविध प्रतिकृतींवर साचलेल्या धुळीची स्वच्छता करून आवश्यक ठिकाणी रंगरंगोटीही करावी, अशी मागणी दिघे येथील सामाजिक कार्यकर्ते संजय गायकवाड यांनी केली.
संपादकीय भूमिकाअशी मागणी का करावी लागते ? संबंधित प्रशासकीय अधिकार्यांना दिसत नाही का ? पालखी मार्ग कायमचाच चांगला रहाण्यासाठी अधिकार्यांनी प्रयत्न करावेत. |