पोलीस दोषींवर तात्काळ कारवाई करत नसल्याने लोकांमध्ये उद्रेक होतो ! – भाजपचे आमदार संजय केळकर  

आमदार संजय केळकर म्हणाले की, पोलीस दोषींवर तात्काळ कारवाई करत नसल्याने लोकांमध्ये उद्रेक होतो………

नाशिकमध्ये विनाकारण रस्त्यावर आणि चौकात गर्दी करण्यार्‍यांवर पोलिसांची ड्रोन कॅमेर्‍याच्या साहाय्याने टेहळणी

कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरात संचारबंदीचे आदेश लागू असतांनाही येथील जुने नाशिक, वडळा, फुलेनगर झोपडपट्टी परिसर अशा अनेक ठिकाणी नागरिक घराबाहेर पडून विनाकारण रस्त्यावर आणि चौकात गर्दी करत आहेत.

कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याची अफवा पसरवणार्‍यास पोलिसांनी घेतले कह्यात

कोरोना विषाणूच्या संदर्भात ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर ध्वनीमुद्रित क्लिप सिद्ध करून अफवा पसरवणार्‍या एका संशयित व्यक्तीस येथील पोलिसांनी २६ मार्च या दिवशी कह्यात घेतले आहे…

इराणी व्यक्ती नगर येथून पसार झाल्याप्रकरणी सिंग रेसिडेन्सी उपाहारगृहच्या मालकासह तिघांवर गुन्हा नोंद

शहरातील तारकपूर परिसरात असलेल्या सिंग रेसिडेन्सी उपाहारगृह येथे २४ मार्च या दिवशी ईराज रेझई (वय ४८ वर्षे) या नावाची इराणी व्यक्ती स्वत:ची ओळख लपवून ६ घंटे राहून निघून गेली…….

दळणवळण बंदी असतांनाही मुंबईतील प्रवाशांना समुद्रमार्गे गुहागरमध्ये आणणार्‍या बोट मालकांवर गुन्हा नोंद

देशात दळणवळण बंदी असतांना आणि त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा बंद असतांना मुंबईतील प्रवाशांना समुद्रमार्गे गुहागरमध्ये आणणार्‍या बोट मालकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुहागरचे पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी ही माहिती दिली आहे.

दळणवळण बंदी झुगारून उत्तरप्रदेशातील मशिदींमध्ये नमाजपठणासाठी गर्दी करणार्‍यांच्या विरोधात गुन्हा नोंद

स्वतःच्या आणि जनतेच्या आरोग्याशी खेळणार्‍या अशा जनताद्रोह्यांवर केवळ गुन्हा नोंद न करता सरकारने त्यांना तात्काळ अटक करून आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !

दळणवळण बंदी झुगारून चारचाकी वाहनातून फिरणार्‍या गुंड पिता-पुत्राकडून पोलिसाला मारहाण

दळणवळण बंदी असतांनाही येथे चारचाकी वाहनातून फिरणारे पिता-पुत्र यांना हटकणार्‍या पोलिसाला त्या दोघांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. धनसिंह आणि त्यांचा मुलगा उमेश सिंह यांना एका पोलिसाने अडवून प्रश्‍न विचारल्यावर त्यांच्यात वाद झाला

सुरक्षित सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) राखण्यासाठी तळेगाव पोलिसांकडून भाजीमंडईमध्ये एक मीटर अंतरावर चौकोनी पट्टे

जनहो, स्वयंशिस्त पाळा ! पोलीस-प्रशासनाचा वेळ छोट्या छोट्या गोष्टींसाठी वाया घालवू नका !

मालेगाव (जिल्हा नाशिक) येथे एम्.आय.एम्. आमदाराच्या समर्थकाकडून त्यांच्यासमोरच वैद्यकीय कर्मचार्‍यास मारहाण

येथील एम्.आय.एम्.चे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्या समर्थकाने येथील सामान्य रुग्णालयाचे अधिष्ठाता आधुनिक वैद्य किशोर डांगे यांना धक्काबुक्की केली आणि वैद्यकीय कर्मचारी मयूर जाधव यांना मारहाण केली.

केरळमध्ये चहा वेळेत न दिल्याने कोरोनाबाधिताकडून परिचारिकेला मारहाण

कोरोनाबाधितांना ठेवलेल्या विलगीकरण कक्षामध्ये (आयसोलेशन वॉर्डमध्ये) डॉक्टर आणि परिचारिका यांना रुग्णांकडून सहकार्य केले जात नसल्याचेही समोर येत आहे.