दळणवळण बंदी झुगारून चारचाकी वाहनातून फिरणार्‍या गुंड पिता-पुत्राकडून पोलिसाला मारहाण

गुंडांना वेळीच कठोर शिक्षा न झाल्याने ते अशा प्रकारचे धाडस करत आहे. अशा गुडांना आता तरी कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !

धार (मध्यप्रदेश) – दळणवळण बंदी असतांनाही येथे चारचाकी वाहनातून फिरणारे पिता-पुत्र यांना हटकणार्‍या पोलिसाला त्या दोघांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. धनसिंह आणि त्यांचा मुलगा उमेश सिंह यांना एका पोलिसाने अडवून प्रश्‍न विचारल्यावर त्यांच्यात वाद झाला आणि त्याचा राग येऊन पिता-पुत्राने सदर पोलिसाला मारहाण केली. हे पिता-पुत्र दोघेही गुन्हेगारी वृत्तीचे असून त्यांच्यावर हत्या, दरोडे आदी अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. पोलिसांनी या दोघांवर गुन्हा नोंदवला आहे.