गोव्यात वनक्षेत्रांतील आग विझली ! – वनमंत्री विश्वजीत राणे

(प्रतिकात्मक चित्र)

पणजी, १४ मार्च (वार्ता.) – राज्यातील वनक्षेत्रांमध्ये १४ मार्च या दिवशी दुपारी १२ वाजेपर्यंत एकाही ठिकाणी आग सक्रीय नाही. वन खात्याचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मिळून एकूण ४०० जणांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हे शक्य झाले, अशी माहिती वनमंत्री विश्वजीत राणे यांनी ट्वीट करून दिली.

ते पुढे म्हणाले, ‘‘आग विझलेली असली, तरी ती पुन्हा चालू होऊ नये, यासाठी संबंधित ठिकाणांवर देखरेख ठेवली जात आहे. दिरोडे, म्हादई अभयारण्यात सुर्ला आदी ठिकाणी आग पुन्हा लागण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी जास्त देखरेख ठेवण्यात आली आहे.’’


वनक्षेत्रांतील आगीसंबंधी अहवाल राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाला सुपुर्द ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

राज्यातील वनक्षेत्रांतील आगीसंबंधीचा अहवाल राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाला सुपुर्द करण्यात आला आहे, तसेच केंद्रीय वन खात्यानेही गोव्यातील वनक्षेत्रांतील आगीसंबंधी आढावा घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

उसकई आणि फोंडकुले-सावर्डे येथील वनक्षेत्रांना नव्याने आग

उसकई येथील सेंट एलिझाबेथ चर्च येथे आणि फोंडकुले-सावर्डे येथील वनक्षेत्रांमध्ये नव्याने आग लागली आहे.