‘आपला कुंभ, आपली जबाबदारी’ पुस्तिका जनजागृतीसाठी उपयुक्त ठरणार ! – कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन
सिंहस्थ कुंभपर्वाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा नाशिककरांसह सर्वांपर्यंत पोचावी, यासाठी ‘सिंहस्थ साहाय्यक समिती’ने प्रकाशित केलेली ‘आपला कुंभ, आपली जबाबदारी’ ही पुस्तिका उपयुक्त ठरेल, असे विधान राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन, तसेच कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.