देशात ‘हरित शहर’ म्हणून नाशिकची ओळख निर्माण करू ! – मंत्री गिरीश महाजन

‘मिशन ग्रीन मान्सून’अंतर्गत नंदिनी नदी परिसरात वृक्षारोपण

गिरीश महाजन

नाशिक – उन्नत नाशिक अभियानाच्या अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या ‘हरित कुंभ – हरित मान्सून’ अर्थात् ‘मिशन ग्रीन मान्सून’ अभियानाच्या तिसर्‍या टप्प्यात नंदिनी नदीच्या दोन्ही काठांवर राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. ‘देशात ‘हरित शहर’ म्हणून नाशिक शहराची ओळख निर्माण करू’, असे त्यांनी सांगितले. येथील वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

‘आगामी सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर नाशिकला देशातील आदर्श, पर्यावरणपूरक आणि नियोजनबद्ध शहर म्हणून विकसित करण्यासाठी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे’, असेही त्यांनी सांगितले.