नाशिक शहर कार्यक्षेत्रात २७ जुलैपर्यंत शस्त्र आणि जमावबंदी आदेश !

नाशिक – कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहर कार्यक्षेत्रात १३ जुलैच्या मध्यरात्रीपासून २७ जुलैच्या रात्री १२ पर्यंत शस्त्र आणि जमावबंदी आदेश जारी केला आहे.

हा आदेश लग्नकार्य, मिरवणुका, तालुका आठवडे बाजार किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू रहाणार नाही. पोलीस अधिकारी, कामावर असलेले इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, तसेच सभा किंवा मिरवणुका काढण्यास रितसर अनुमती घेतलेल्यांनाही हा आदेश लागू नाही. ‘आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल’, असेही श्री. कर्णिक यांनी आदेशात नमूद केले आहे.