
मुंबई, ९ जुलै (वार्ता.) – नाशिक येथील सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीची गर्दी टाळण्यासाठी ‘रिंगरोड’च्या (बाह्यवळण मार्ग) निर्मितीचे काम चालू आहे. या मार्गासाठी सरकारकडून भूसंपादन केले जात आहे; परंतु भूसंपादनातून अधिक पटीने पैसे मिळतील, यासाठी स्थानिक नागरिकांकडून ३ वर्षांपूर्वीच या मार्गासाठी भूमी खरेदी करण्यात आल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या आहेत. असा प्रकार झाला का ? तसेच पैसे मिळावेत, यासाठी भूमीच्या रेखांकनात पालट करण्यात आला आहे का ? या सर्व प्रकारांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ९ जुलै या दिवशी विधानसभेत केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांनी भूसंपादनाला विरोध करणार्या स्थानिक नागरिकांना अधिकार्यांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला. यामध्ये अधिकार्यांचा दोष नसल्याचे महसूलमंत्र्यांनी स्पष्ट केले. भूसंपादनाविषयी ते म्हणाले, ‘‘रिंगरोडसाठी भूमी खरेदी करतांना भूसंपादनाचे रेखांकन पालटण्यात आले का ? आणि पालटले असल्यास त्याला जिल्हाधिकार्यांनी अनुमती का दिली ? याविषयी चौकशी केली जाईल. ‘रिंगरोड’साठी न्यूनतम भूसंपादन व्हावे, तसेच अस्तित्वात असलेल्या मार्गाला प्राधान्य दिले जाईल. सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर रिंगरोड महत्त्वाचा आहे. या मार्गासाठी बळजोरीने भूसंपादन केले जाणार नाही.’’
मोशी दुर्घटनेत अग्नीशमनदलाच्या कर्मचार्यांनी ९ जणांना वाचवले !
अटक केलेल्या भाऊसाहेब चव्हाण अधिकार्याला बडतर्फ करू !
अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांना सेवेत घेऊ ! – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
‘लोकराज्य’ मासिकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र ‘मिरर’ स्वरूपात छापले; मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आश्वासन !
जंजिरा गडावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवण्याच्या मागणीसाठी ‘सह्याद्री प्रतिष्ठान’चे मुंबईत तीव्र आंदोलन !
‘गोकुळ’च्या अपकीर्तीच्या विरोधात डॉ. युवराज येडुरे यांचे भर पावसात आत्मक्लेष आंदोलन !