रजा मेमन, शाहरूख कुरेशी यांचे जामीन आवेदन फेटाळले !

‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरण

नाशिक – ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणी कारागृहात असलेले संशयित आरोपी रजा मेमन आणि शाहरूख कुरेशी यांचे जामीन आवेदन येथील जिल्हा न्यायालयाने फेटाळले आहे. ‘टी.सी.एस्.’ आयटी आस्थापनात घडलेल्या धर्मांतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा न्यायाधीश अमित खारकर यांनी हा निर्णय दिला.

‘अशा परिस्थितीत संशयितांना जामीन दिल्यास ते पुराव्यांशी छेडछाड करून पीडितांना धमकावू शकतात’, असा युक्तीवाद सरकारी अधिवक्त्यांनी केला. तो न्यायालयाने ग्राह्य धरला. ‘टी.सी.एस्.’ आस्थापनात हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून धर्मांतरासाठी नाव पालटून तिला परदेशात पाठवण्याचा कट रचल्याप्रकरणी देवळाली कँप आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यात ९ गुन्हे नोंद आहेत.