नवी मुंबई (को.वि. मा. का.) – राज्यात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने कोकण विभागीय नगररचना विभागाचे सहसंचालक यांच्या वतीने १३ ऑगस्ट या दिवशी सर्व शासकीय कर्मचार्यांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. टाटा मेमोरियल रुग्णालयामध्ये सध्या कर्करोगाने बाधित असलेल्या आणि उपचार घेणार्या रुग्णांना, तसेच कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे कोकण भवन आणि जवळील परिसरातील सर्व अधिकारी, कर्मचारी अन् नागरिक यांनी मानवहितार्थ अधिकाधिक संख्येने शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे आणि या समाजकार्यात कर्तव्यभावनेने आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन सहसंचालक यांनी केले आहे.