
मुंबई – अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणे, तिला डोळा मारणे आणि पैशांचे आमीष दाखवून तिला जवळ बोलावणार्या २८ वर्षांच्या युवकाला विशेष पोक्सो न्यायालयाने ४ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. दोषी युवक आतापर्यंत ४ वर्षे कारागृहात असल्यामुळे न्यायालयाने त्याला आणखी ३ दिवसांची साधी शिक्षा ठोठावली आहे. (असे किती नागरिक न्यायासाठी रखडले असतील ? ‘न्याय’ या शब्दाला खर्या अर्थाने सार्थकी करण्यासाठी न्यायव्यवस्था गतीमान व्हायला हवी. यासाठी केंद्रशासनाने ठोस उपाययोजना करणे अपेक्षित आहे. – संपादक)
या प्रकरणी ६ मार्च २०१७ या दिवशी मुलीच्या आईने देवनार पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. मुलगी दूध आणण्यासाठी घराबाहेर गेली असतांना आरोपीने तिच्याशी गैरप्रकार केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी पूर्ववैमनस्यातून आरोपीला गोवल्याचे आरोपीच्या अधिवक्त्याने न्यायालयात म्हटले; मात्र त्याविषयी कोणतेही ठोस पुरावे त्यांना न्यायालयात सादर करता आले नाहीत.
मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण ! – सुभाष शिरोडकर, मंत्री
युवतीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयाने ग्रामस्थांनी एका शिक्षकाला चोपले !
इयत्ता १० वीच्या परीक्षेतील कॉपी प्रकरणाचे मुख्य सूत्रधार मुख्याध्यापकच
आजारांना दूर ठेवण्यासाठी ‘योग’ हा रामबाण उपाय ! – मुख्यमंत्री फडणवीस
संवाद साधण्याचा प्रयत्न; परंतु राजकारण केल्यास राजकीय उत्तर देऊ ! – मुख्यमंत्री
नालासोपारा येथे २ मुसलमान अमली पदार्थ तस्करांना अटक