कुर्ला (मुंबई) येथे साध्वी सरस्वती यांच्या उपस्थितीत श्री यंत्राच्या १८ लाख मंत्रांचे महाअनुष्ठान संपन्न !

श्री यंत्राचे पूजन करतांना साध्वी सरस्वती

मुंबई, १७ ऑक्टोबर (वार्ता.) – साध्वी सरस्वती यांच्या वंदनीय उपस्थितीत १० ते १२ ऑक्टोबर या कालावधीत कुर्ला येथील गाडगे महाराज विद्यालय येथे श्री यंत्राच्या १८ लाख मंत्रांचे महाअनुष्ठान करण्यात आले. महामारीच्या निवारणार्थ आणि विश्वकल्याण या उद्देशांनी या महाअनुष्ठानाचे आयोजन करण्यात आले होते. या अनुष्ठानासाठी केवळ निमंत्रित मान्यवरांना बोलावण्यात आले होते. कोरोनाविषयीच्या नियमांचे पालन करून हे अनुष्ठान पार पडले.