बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ‘राष्ट्रीय नागरिकता नोंदणी कायदा’ त्वरित लागू करावा !

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांच्या पार्श्वभूमीवर भारतात ‘राष्ट्रीय नागरिकता नोंदणी कायदा’ (एन्.आर्.सी.) त्वरित लागू करून अवैधरित्या देशात रहाणार्‍या बांगलादेशी मुसलमानांना हुसकावून लावण्यात यावे, अशी मागणी अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी निवेदनाद्वारे केली आहे

‘मिथिनेल’च्या निर्मितीसाठी केंद्रशासन साखर कारखान्यांना निधीची तरतूद करणार ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

राज्यातील साखर कारखान्यांच्या विविध समस्यांविषयी देवेंद्र फडणवीस यांसह भाजपचे नेते रावसाहेब दानवे, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील यांनी १९ ऑक्टोबर या दिवशी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.

‘सीबीआय’चे संचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्याविषयी न्यायालयीन प्रकरणात राज्य सरकारकडून १४ वर्षांनंतर प्रतिज्ञापत्र सादर !

केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआयचे) संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांच्या पूर्वीच्या एका न्यायालयीन प्रकरणात राज्य सरकारने १४ वर्षांनंतर मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून हे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्याची विनंती न्यायालयाला केली आहे.

बांगलादेशाप्रमाणे मुंबईतही हिंदु असुरक्षित ! – आमदार नीतेश राणे, भाजप

मालवणी भागातील हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा ठिकाणी जाऊन आम्ही हिंदूंमध्ये धारिष्ट्य निर्माण करणार आहोत. बांगलादेशाप्रमाणे मुंबईतही हिंदू असुरक्षित आहे. मुंबईतील हिंदूंच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरणार आहोत, असे वक्तव्य भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी केले.

आर्यन खान याच्यासह तिघांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला !

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याच्यासह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या तिघांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळून लावला आहे. ‘कॉर्डेलिया क्रूझ’वर धाड टाकल्यानंतर केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने या सर्वांना अटक केली होती.

भाजपचे १५-२० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात ! – यशवंत जाधव, स्थायी समिती सदस्य, शिवसेना, मुंबई महानगरपालिका

मुंबईतील नगरसेवक भाजपच्या नेतृत्वाला कंटाळले आहेत. त्यामुळे ते शिवसेनेमध्ये येण्याच्या सिद्धतेत आहेत. भाजपचे १५-२० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात आहेत, असे वक्तव्य मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सदस्य यशवंत जाधव यांनी १८ ऑक्टोबर या दिवशी पत्रकार परिषदेत केले.

२२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे चालू होणार !

कोरोनामुळे राज्यात बंद असलेली चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहे ५० टक्के प्रेक्षक क्षमतेच्या मर्यादेत २२ ऑक्टोबरपासून चालू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. चित्रपटगृहे चालू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोसिएशन’च्या पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

वाशी (नवी मुंबई) येथे दुर्गामाता दौडीमध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांचा उत्साहात सहभाग !

विजयादशमीच्या दिवशी येथील छत्रपती शिवाजी चौक येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या पुढाकाराने दुर्गामाता दौड काढण्यात आली. विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि धारकरी मिळून ५०० जण या दौडीमध्ये सहभागी झाले होते. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे नवी मुंबईचे समन्वयक श्री. भरत माळी यांच्या नेतृत्वाखाली ही दौड पार पडली.

भारताची स्थिती अफगाणिस्तानसारखी होऊ नये; म्हणून ‘हिंदु राष्ट्रा’साठी सर्व नेत्यांनी एकत्र यावे ! – साध्वी कांचन गिरीजी

पुढील १० वर्षांत भारताची स्थिती अफगाणिस्तानसारखी होऊ नये; म्हणून हिंदु राष्ट्रासाठी सर्व नेत्यांनी एकत्र यावे, असे आवाहन साध्वी कांचन गिरीजी यांनी केले आहे.

कोरोनाच्या आर्थिक संकटातही महाराष्ट्र सरकारकडून मुसलमानांवर कोट्यवधी रुपयांची खैरात !

स्वतंत्र भारताच्या ७४ वर्षांत बहुसंख्य हिंदु समाजाला नेहमीच सापत्नपणाची नि दुय्यम दर्जाची वागणूक मिळाली, हा इतिहास आहे. यावर सर्वंकष हिंदुहित साधणारे ‘हिंदु राष्ट्र’च एकमेव उपाय आहे, हे जाणा !