कोरोना प्रतिबंधक १ डोस घेतलेल्यांना सर्वत्र प्रवेश देण्याविषयीचा निर्णय दिवाळीनंतर ! – आरोग्यमंत्री टोपे

आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई – दिवाळीत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येचा आढावा घेण्यात येणार आहे. जनतेला होणार्‍या असुविधेतून वाचवण्यासाठी लसीची एक मात्राही पुरेशी ठरणार आहे. ‘टास्क फोर्स’च्या सहमतीने कोरोनाचा एक डोस घेतलेल्या नागरिकांना समाजात सर्वत्र प्रवेश देण्याविषयीचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिवाळीनंतर घेतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी १७ ऑक्टोबर या दिवशी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली.

या वेळी राजेश टोपे म्हणाले, ‘‘सणांच्या कालावधीत नागरिक मोठ्या प्रमाणात सर्वत्र गर्दी करतात. मंदिरे, तसेच चित्रपटगृहे उघडण्यात आली आहेत. आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या न्यून होत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात राहिली, तर नियमांमध्ये शिथिलता आणता येईल.’’